सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झालेल्यांनी… : भाजपा नेत्याची शिवसेनेवर टीका

Uddhav Thackeray - BJP

मुंबई :- सध्या महाराष्ट्रात आणीबाणी शब्दावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना, देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केला. यावरून भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेने (Shiv Sena) केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

ही बातमी पण वाचा : अजित पवार – देवेंद्र फडणवीसांमध्ये खडाजंगी ; मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चावरून वादंग

सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली, त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये”, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. आजवर महाराष्ट्रात डौलाने फडकणारा भगवा खाली खेचण्याची तुमचे पोलीस हिंमत करतात हे राज्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवाळाची चिंता करा, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सडकून टीका केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER