रुग्णालयात असूनही पवारांची परंपरा कायम, गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र

Sharad Pawar Family

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) रुग्णालयातच उपचार घेत आहेत. पुढच्या दोन दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी माहिती आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती. मात्र रुग्णालयात असूनही आज गुढीपाडव्यानिमित्त पवारांनी आपली परंपरा कायम राखली.

शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबूक अकाऊंटवरुन शरद पवार यांच्या सोबतचे छायाचित्र शेअर केले आहे. या फोटोमध्ये संपूर्ण पवार कुटुंब दिसत आहे. शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार या देखील यावेळी उपस्थित होत्या.

सुप्रिया सुळे यांनी एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘आदरणीय शरद पवार साहेबांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरचा हा गुढीपाडवा. बाबा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना भेटण्यासाठी अजितदादा आणि सुनेत्रावहिनी आले. यानिमित्ताने आई, बाबा, दादा-वहिनी आणि आम्ही दोघे असे सर्वजण हॉस्पिटलमध्ये एकत्र आलो’, असं म्हटलं आहे.

सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नेहमीच्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करता येत नाही. पण कुटुंबीयांच्या सोबत आनंदाचे क्षण वाटून घेऊन आपणास या परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा मिळेल. गुढीपाडव्याचा हा सण आनंदाने साजरा करा. काळजी घ्या, सुरक्षित रहा!, असंही आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button