इतके प्रेम करूनही उमेश यादवच्या ‘या’ गोष्टीमुळे चिंतित असते त्याची पत्नी तान्या

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपल्या गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांना बोल्ड केले असेल, पण एका हसीनाच्या प्रेमात तो स्वतः बोल्ड झाला आहे.

Cricket

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती; पण जेव्हा त्याला असे वाटले की, क्रिकेटमध्ये यापुढे काहीही करता येणार नाही.  तेव्हा त्याने पोलिसाची नोकरी शोधण्यास सुरुवात केली; परंतु देवाने  त्याच्या  नशिबात पोलिसाची नोकरी नव्हे, तर तो एक खेळाडू बनण्याचे लिहिले होते. तसे, या लेखात क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीवर बोलायचे नाही. आज आपण त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलू. त्याचे वैयक्तिक जीवनही खूप रोमांचक आहे. तर चला आज उमेशच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल जाणून घेऊ या.

आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान उमेश यादव आणि तान्या वाधवाची पहिली भेट झाली. तान्या तिच्या काही मित्रांसह क्रिकेट सामना पाहण्यासाठी आली होता. त्यातील एक मित्र उमेशला ओळखत होता आणि त्यानेच तान्या आणि उमेशची ओळख करून दिली होती. पहिल्या भेटीतच ते दोघेही चांगले मित्र बनले. या भेटीनंतर दोघे अनेकदा फोनवर बोलू लागले.  वारंवार भेटी झाल्या. त्यानंतर हळूहळू प्रेमात रूपांतर झाले.

ही बातमी पण वाचा : शिखर धवन त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या आयशा मुखर्जीच्या प्रेमात कसा…

लग्नानंतर तान्या एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल म्हणाली, ‘२०१२ मध्ये उमेशने मला प्रपोज केले होते आणि मीही हो म्हणाले.’ त्यानंतर तान्या आणि उमेशने पुढल्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये लग्न केले. लग्नानंतर लवकरच उमेशची इंग्लंडमधील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी निवड झाली.  जरी खेळाडूंना पत्नीला जास्त काळ त्यांच्याबरोबर ठेवण्याची परवानगी मिळत नाही; पण उमेशचे नुकतेच लग्न झाले होते, या कारणाने बीसीसीआयने उमेशला पत्नी तान्याला क्रिकेट दौर्‍यावर नेण्यास परवानगी दिली. परवानगी मिळताच ते दोघे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पॅरीसमध्ये हनिमूनला गेले आणि नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना झाले.

तान्याला उमेशचा साधेपणा आवडतो.  तिने सांगितले की, ‘उमेश हा अतिशय साधा मुलगा आहे आणि तो त्याच्या मातीशी जुळलेला आहे.  तो माझ्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक ऐकतो.’ तान्या उमेशबद्दल म्हणाली, ‘उमेश खूप संस्कारी आहे, मी जेव्हा मोठ्याने बोलते तेव्हा तो मला विनोद करून टोकतो. पण या सर्व प्रकारानंतरही उमेशबद्दल एक गोष्ट तान्याला त्रास देते आणि ती म्हणजे त्याची लांबी होय. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची उंची चांगली आहे, तर त्याच्या तुलनेत तान्याची उंची खूपच कमी आहे. त्यांच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत आणि आजही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER