देशमुखांच्या अडचणीत वाढ, उद्यापासून सीबीआयच्या टीमकडून तपासाला सुरूवात

Anil Deshmukh - CBI - Maharastra Today

मुंबई :- अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि ॲड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता सीबीआयIची टीम उद्याच सकाळी मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर लगेच याबाबतचा तपास सुरु होणार आहे.

मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला १५ दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

ही बातमी पण वाचा : राजीनाम्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीत दाखल, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button