देशमुखांचा राजीनामा ही फक्त सुरूवात, आगे आगे देखो होता है क्या? गिरीश महाजनांचा इशारा

anil deshmukh - Girish Mahajan - Maharastra Today

मुंबई : ठाकरे सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे’, आगे आगे देखो होता है क्या? असा इशारा भाजपचे संकटमोचक समजले जाणारे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ‘ठाकरे’ सरकारला दिला आहे. राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख (AnilDeshmukh) यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरुवात असून पुढे अजून बरीच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?, असा इशारा महाजनांनी ट्विटरवरुन दिला.

निगरगट्ट ठाकरे सरकारने पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे, असा इशारा महाजनांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button