देशमुखांची अडचण वाढणार, परमबीर सिंग यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी?

Anil Deshmukh-Supreme Court

नवी दिल्ली :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर महिन्याला १०० कोटींचे टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर उद्याच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुभाष रेड्डी (Justice Subhash Reddy) यांचा समावेश असलेलं सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ उद्या या याचिकेवर सुनावणी करणार आहे. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

ही बातमी पण वाचा : परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर काँग्रेसची नाहक बदनामी, सोनिया आणि राहुल गांधी नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER