
मुंबई : परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. ‘या संबंधित असलेला सचिन वाझे याला पाठीशी घालणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया का देत नाहीत? किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत?’ असा सवाल खासदार नारायण राणे (Naryan Rane) यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी न्यायालयात अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अॅड. जयश्री पाटील यांनीदेखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली. या प्रकरणी आणखी तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारसाठी धक्कादायक आहे. न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केलेल्या दाव्याची चौकशी सीबीआयने १५ दिवसांत करावी, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाबद्दल बहुतांशी राजकारणी प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सचिन वाझेला उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत? किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत? असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी ट्विटवर उपस्थित केला आहे.
या केसशी संबंधित असलेल्या वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत? (२/२) #AnilDeshmukh #ParamBirSingh @CMOMaharashtra
— Narayan Rane (@MeNarayanRane) April 5, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला