अनिल देशमुखांची याचिका : बाजू न ऐकताच हायकोर्टाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला

Anil Deshmukh - Supreme Court - Maharashtra Today

नवी दिल्ली :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय (CBI) चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राष्ट्रवादीचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान दिलं आहे. आपली बाजू ऐकून न घेता हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले असून या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख काल दिल्लीत आले होते. त्यानंतर आज त्यांनी सर्वोच्च न्यायालयात २९० पानांची विशेष अनुमती याचिका दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं. या याचिकेत अनेक महत्त्वाचे मुद्दे  मांडण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने या प्रकरणात आपली बाजू ऐकून न घेता थेट निर्णय दिला. हा नैसर्गिक न्याय नाही, असं देशमुख यांनी याचिकेत म्हटलं आहे. तसेच सीबीआयला पूर्णवेळ संचालक नसताना सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची घाई का? असा प्रश्नही त्यांनी याचिकेतून उपस्थित केला असून या मुद्द्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच या याचिकेतून त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘अनिल देशमुख महत्वाचे नाही, सरकार पडण्यासारख्या गोष्टी घडतायेत’ – राज ठाकरे

राज्य सरकारचे आवाहन

दरम्यान, राज्य सरकारनेही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला १०० कोटी रुपये दरमहिन्याला वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप केला होता. त्यावर कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे

  • परमबीर सिंग यांच्या लेटरवर सही नव्हती. अशा  कोणत्याही कागदावर सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य का?
  • अनिल देशमुख यांना बोलायची कोणतीही संधी दिली नाही, मला माझी बाजू मांडू देण्यात यावी.
  • हायकोर्टाने तक्रार दाखल करावी याबद्दल हस्तक्षेप केला नाही.
  • सीबीआयला सध्या पूर्णवेळ संचालक नाही, मग चौकशीची घाई का?
  • महाराष्ट्र पोलीस आणि यंत्रणा यावर विश्वास ठेवला पाहिजे.

ही बातमी पण वाचा : सीबीआय चौकशीविरोधात अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात, तर जयश्री पाटीलांकडून कॅव्हेट दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button