तब्बल १० तास सीबीआयकडून देशमुखांची चौकशी; सहकार्य केल्याची देशमुखांची स्पष्टोक्ती

Anil Deshmukh - CBI - Maharastra Today

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळी त्यांच्या नागपुरातील घरासह इतर १० ठिकाणी छापेमारी केली. दरम्यान जवळपास १० तासांच्या झाडाझडतीनंतर सीबीआयचे अधिकारी, अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरातून बाहेर पडले आहे. यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतल्या.

दरम्यान, सीबीआयचे (CBI) अधिकारी घराबाहेर पडल्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी चर्चा करत सीबीआयच्या अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य केल्याची माहिती दिली. आज सकाळी सीबीआयचे अधिकारी माझ्या घरी आले होते. त्यांनी घरात शोधमोहीम राबवली. त्यांना आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता मी माझ्या मतदारसंघातील काटोल येथे कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button