देशमुखांनी सीबीआयकडे परबांचं नाव घेतलं, एनआयए त्यांना उचलून नेतील; राणेंचा गौप्यस्फोट

narayan rane - anil deshmukh - anil parab - Maharastra Today
narayan rane - anil deshmukh - anil parab - Maharastra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या झालेल्या सीबीआय (CBI) चौकशीबाबत भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयने नुकतीच आठ तास चौकशी केली आहे. तर सचिन वाझे सचिन वाझे हा सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. याविषयी बोलताना नारायण राणे यांनी परब (Anil Parab) यांच्या निशाणा साधला.

ते म्हणाले, कायदेशीरदृष्ट्या पाहिलं तर अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबानीमध्ये जी नावं घेतली आहेत त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अनिल परब यांचं नाव घेतलं आहे. या प्रकरणात पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल, असं आम्ही उगाच म्हटलं नव्हतं. अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. अजिबात कमिशन न घेता जमा करायचं आणि आणून द्यायचं. हे त्यांचं काम आहे. त्यांची चौकशी सेवा आणि मेवा कसा गोळा केला आणि कुठे पोहोचवला, यासाठी ही चौकशी चालली आहे. अनिल परब यांना एनआयए तपासासाठी घेऊन जाईल. एनआयए फक्त राज्यपालांची परवानगी घेणार आहे. चौकशीला जाण्यापूर्वी त्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनिल परब चौकशीसाठी तयार नसतील तर ते त्यांना उचलून नेतील, असे खळबळजनक विधानही राणे यांनी केले आहे. त्यामुळे देशमुख यांच्यापाठोपाठ परब यांचीही चौकशी होणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button