बीडमध्ये २२ मृतदेहांची विटंबना; पंकजा मुंडेंकडून संताप व्यक्त

Dead Bodies - Pankaja Munde

बीड : बीडमध्ये (Beed) एक नव्हे तर २२ मृतदेह एकाच रुग्णवाहिकेत नेण्यात आले. या घटनेबद्दल भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जातीने बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावे. कारण ज्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे, ते आपले हक्काचे कर्तव्य बजावत नाहीत, अशा शब्दांत पंकजा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव न घेता लक्ष्य साधले आहे.

“२२ जणांचे मृतदेह सामानाप्रमाणे भरून अंत्यसंस्कारासाठी पाठवले गेले. ही गंभीर घटना माझ्या बीड जिल्ह्यातील आहे. या घटनेबद्दल शोक किंवा संताप व्यक्त करावा की नाही हे मला माहीत नाही. बीड जिल्ह्याच्या आणि सध्याच्या कोरोनाच्या भविष्यासाठी ही परिस्थिती अत्यंत भीषण आहे.” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

“राजकारणात माझी कधीच भूमिका नव्हती. यामुळे कदाचित मला दुखापत झाली असेल, परंतु मी माझी भूमिका प्रभावीपणे आणि स्पष्टपणे मांडली आहे. आज बीड जिल्ह्यात जे काही होत आहे हे पाहून मी हात जोडून विनंती करते. माननीय मुख्यमंत्री, शरद पवार साहेब, अजित पवार यांना मी विनंती करते की, जातीने बीड जिल्ह्याकडे लक्ष द्या. ज्यांना आम्ही सरकारची जबाबदारी दिली आहे, ते आपले कर्तव्य बजावत नाहीत हे प्रत्येक वेळी स्पष्ट झाले आहे.” अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

“मी अजितदादांची प्रतिक्रिया ऐकली की रेमडेसिवीर कोणाच्या हातून किंवा कोणच्या खिशातून वाटणे चुकीचे आहे. माझ्या बीड जिल्ह्यातील लोकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. ज्यांच्यावर जबाबदारी दिली, ते निष्काळजीपणे काम करत आहेत. आपण याविषयी चौकशी केली पाहिजे. जातीने लक्ष द्यावे. आपण स्पष्ट भूमिका बजावली आहे आणि आपण ज्याला जबाबदार धरले आहे, ते उलट वागले असेल तर चौकशी झाली पाहिजे. रेमडेसिवीर न मिळाल्याने कोणाचा जीव जात असेल तर याला जबाबदार कोण? हा माझा प्रश्न आहे.” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button