भारतात राहणारे सिंकदराचे वंशज आता जगतात गांजाच्या पिकावर !

Sinkdar

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचे संकेत दिसत आहेत. या परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) , व्हॅक्सीन, व्हायरस सह आयसोलेशन असे शब्द फिरुन फिरुन कानावर पडतायेत. आयसोलेशन म्हणजे इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवून कोरोना बरा होईपर्यंत २१ दिवसांचा काळ. पण तुम्हाला माहितीये का भारतात एक असं गाव आहे, ज्यानं स्वतःला इतर जगापासून आयसोलेट करुन घेतलंय. सिंकदराच्या (Sinkdar) भारत स्वारीनंतर त्याचे काही सैनिक इथंच भारतात राहिले. प्राचिन ग्रीकच्या साऱ्या खाणाखुणांसह त्यांनी अनेक गोष्टी इथं जपून ठेवल्यात. सिंकदरांच्या वंशजांचं गाव इतकीच फक्त या गावची ओळख शिल्लक नाही. या गावाला आणखीन एक ओळख आहे, जगातला सर्वोत्तम दर्जाचा गांजा इथं मिळतो.

भारत इतर देशांप्रमाण लोकशाही देश आहे. लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी म्हणून इथं संविधानही आहे. पण भारतातल्याच ‘मलाण’ नावच्या गावात न कायदे चालतात न कुठले नियम.हिमाचल प्रदेशातील मलाण या गावात लोक सरकारी नियमांना नाही तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेला मानतात. पर्वतांनी वेढलेल्या हिमाचलमधील कुल्लु जिल्ह्यातलं छोटंस खेडं मलाण. जगातली सर्वात जुनी लोकशाही याच खेड्यात सुरु झाल्याचं मानलं जातं. या गावात काही नियम बनवण्यात आलेत.

खेड्यात वसते संसद

या गावात स्वतःच वेगळं संसद भवन आहे. एकूण ११ सदस्य या संसद संख्येपैकी ८ सदस्यांची निवड गावकरी करतात. तर उरलेले तीन पुजारी आणि दोन प्रतिष्ठीत व्यक्ती स्थायी सदस्य असतात. गावतल्या प्रत्येक घराला या संसदेच्या सदस्यत्त्वाचा बहूमान मिळतोच. घरातला सर्वात जेष्ठ व्यक्ती या संसदेचा सदस्य असतो. मलाण गावात फक्त संसद नाही तर इथं स्वतंत्र प्रशासनही आहे. कायदा सुव्यस्था राखण्यासाठी इथं कायदेही बनले जातात. स्वतंत्र पोलिस दलाची निर्मिती इथं करण्यात आलीये. पोलिसांच्या कामात इथलं सरकार दखल देत नाही.

संसदेतले महत्त्वाचे निर्णय देवनितीवर घेतले जातात. संसद भवनात ऐतहासिक स्वरुपातली पंचायत भरते. या पंचायतीला ११ सदस्य हजर असतात. सामान्यपणे तर चर्चेतूनच मार्ग काढला जातो पण तरीही मार्ग निघाला नाही तर ‘जमलू’ देवते समोर प्रकरण ठेवून त्याचा निर्णय घेतला जातो.

जमलू देवाचा निर्णय असतो अंतिम

या गावातले लोक ऋषी जमलू यांना देव मनतात. त्यांचा निर्णय खरा आणि अंतिम असल्याची त्यांची मान्यता असते. एखाद्या प्रकरणावर जमलू देवाचा निर्णयच अंतिम मानला जातो. हा निर्णय घेण्यासाठी दोन बकरे मागवले जाता. दोन्ही बकऱ्यांच्या पायांना कापून त्यात वीष भरलं जातं. जो बकरा आधी मरेल त्याला दोषी ठरवण्यात येतं. या निर्णयावर कुणीच प्रश्न उपस्थीत करु शकत नाही. कारण हा निर्णय स्वतः जमलू देवानं घेतल्याच लोक मानतात. २०१२ नंतर इथली परिस्थीती बरीच बदललीये. २०१२ आधी इथं निवडणूकाही होत नव्हत्या पण आता निवडणूका या गावात घेतल्या जातायेत.

नशेचा व्यापार करण्यात अग्रेसर

अनेक रहस्यांनी वेढलेल्या या गावात अंमली पदार्थांचा व्यापार मोठ्याप्रमाणात होतो. मलाण गावची चरस संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. याला ‘मलाण क्रिम’ यानावानं देखील ओळखलं जातं. यागावातून मोठ्याप्रमाणात अफिम आणि चरस सारख्या अंमली पदार्थांची तस्करी केली जाते.

अकबराची होते पुजा

मलाणमध्ये अकबर बादशाहला पुजतात. मलाणवासी वर्षातून एकदा ‘फागली उत्सव’ अकबराच्या नावानं साजरा करतात. जमलू ऋषीची परिक्षा घेण्याच्या विचारात अकबर होता, तेव्हा जमलू ऋषींनी दिल्ली दरबारात बर्फवृष्टी केली. त्यांचा चमत्कार पाहून अकबरानं जमलू ऋषीची पुजा सुरु केली आणि मलाणावासीयांनी अकबराची. अशी कथा प्रचलित आहे.

सिंकदराने भारतावर स्वारी केली आणि त्याच्या सैन्यातले काही सैनिक भारतातच सोडून तो परतला. याच सैनिकांनी मलाण वसवलं. इथल्या रहिवाशांचे हावभाव, स्वभाव, डोळ्यांची ठेवण भारतीयांसारखी नसून ती ग्रीक लोकांसारखी आहे.

आयसोलेशन

मलाणामध्ये बाहूरुन येणाऱ्या लोकांना अतिथीप्रमाणे वागणूक मिळत नाही. गावच्या बाहेर त्यांचे तब्बू टाकले जातात. तिथंच रहायची आणि खायची व्यवस्था पर्यटकांची व्यवस्था केली जाते. गरजेची प्रत्येक गोष्ट त्यांना काठीच्या आधारे सरकावली जाते. मलाणातल्या कुठल्याही गोष्टीला हात लावला तर १ हजारांपासून ते अडीच हजारांपर्यंतचा दंड भरावा लागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER