शर्मिष्टा होणार देसाईची सून

sharmishta

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. आता याच पंक्तीत बिग बॉस मराठी फ़ेम शर्मिष्ठा राऊत हिने देखील हाताला मेहंदी लावण्याची तयारी सुरू केली आहे. शर्मिष्ठा च्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव तेजस देसाई असून तिने आपल्या सोशल मीडियावर तेजस सोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर करून चाहत्यांना ट्रीट दिली आहे.

जून महिन्यात शर्मिष्ठा आणि तेजसचा साखरपुडा झाला होता मात्र तेव्हा लवकरच आपण लग्न करणार असल्याचे तिने सांगितले होते. आता 11 ऑक्टोबर हा दिवस तिने लग्नासाठी निवडला असून कधी एकदा तेजसच्या घराचे माप ओलांडते असे झाले आहे अशी भावनाही तिने व्यक्त केली आहे. तेजस हा बॉस कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतो.

शर्मिष्ठा आणि तेजस यांचं नेमकं कुठं जुळून आलं असा प्रश्न चाहत्यांना पडू शकतो आणि त्याचे उत्तर तीने अगदी दिलखुलासपणे दिलं आहे. त्यांनी सांगितलं की सुप्रिया या तिच्या बहिणीने तेजस सोबत ओळख करून दिली. खरेतर पहिल्या भेटीतच तेजस मला खूप आवडला त्यानंतर आमच्या काही भेटी झाल्या. फिल्मी स्टाईल असलं तरी दिसायला अरेंज मॅरेज असल तरी भेटीगाठी तून आमच प्रेम वाढल्याने आम्ही आमचं लव्ह मॅरेज आहे असेच म्हणतो .

तो त्याच्या कामात इतका व्यस्त असतो की त्याला मालिका वगैरे पाहायला वेळच नसतो. त्यामुळे जेव्हा माझी त्याची भेट झाली तेव्हा मी मालिकांमध्ये काम करते याविषयी त्याला काहीच कल्पना नव्हती. माझी ओळख झाल्या नंतर त्याने माझा सिनेमा बघितला आणि काही मालिका युट्युब वर पाहिल्या. सुरुवातीला तो डान्सर म्हणून शो करायचा मात्र त्यानंतर तो त्याच्या मॅनेजमेंटच्या कामात रमला आणि त्याचं ह्या रुपेरी इंडस्ट्रीची असलेलं थोडाफार नातं कमी झालं, पण काही का असेना तेजसला मी काम करत असल्याने या क्षेत्राची थोडीशी माहिती असल्यामुळे मला त्याच्यासोबत लग्न करताना कोणतेही दडपण असणार नाही.

शर्मिष्ठा ने मन उधाण वाऱ्याचे मधील साकारलेली नीरजा ही भूमिका भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तर जुळून येती रेशिम गाठी या मालिकेतील व्यक्तिरेखा देखील खूप लोकप्रिय झाली होती . सध्या ती सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेत काम करत आहे.. मालिकाच्या सोबतीने रंगभूमीवर देखील उत्तम कामगिरी बजावली. जो भी होगा देखा जयेगा, टॉम अँड जेरी, बायको असून शेजारी, शंभू राजे या नाटकात तिने काम केले आहे. दे धक्का, फक्त लढ म्हणा, चि व ची सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील तिने भूमिका साकारल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER