बाबरी खटल्याचा निकाल देणार्‍या न्यायाधीशांना नेमले उप-लोकायुक्त

Surendra Kumar Yadav

लखनऊ :- अयोध्या येथील बाबरी मशीद उद्ध्वस्त केली जाण्याशी संबंधित फौजदारी खटल्यात आरोपी असलेल्या भाजपा व संघ परिवारातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना निर्दोष सोडण्याचा निकाल देणारे विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाचे (CBI) न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव (Surendra Kumar Yadav) यांना उत्तरप्रदेश सरकारने निवृत्तीनंतर राज्याचे उप-लोकायुक्त नेमले आहे.

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी यादव यांच्या नियुक्तीचा आदेश ६ एप्रिल रोजी काढला होता. सोमवारी त्यांचा उप-लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला.

बाबरी विध्वंस खटला हा यादव यांनी न्यायाधीश म्हणून चालविलेला शेवटचा खटला होता. खटला अपूर्ण असतानाच खरे तर त्यांचे निवृत्तीचे वय झाले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार त्यांना खटला पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ दिली गेली होती.

यादव यांनी बाबरी खटल्याचा दोन हजार पानी निकाल ३० सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. त्यात त्यांनी बाबरी मशीद पाडली जाणे ही पूर्वनियोजित पद्धतीने केलेली कृती नव्हती व त्यामागे कोणतेही गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान नव्हते, असा निष्कर्ष नोंदवत लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंग अशा ज्येष्ठ भाजपा नेत्यांसह सर्व ३२ आरोपींना निर्दोष मुक्त केले होते.

ही बातमी पण वाचा : रमझानमध्ये जुम्मा मशिदीत नमाजाची परवानगी नाकारली

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button