दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण ; उप वन संरक्षक विनोद शिवकुमारला अटक

Maharashtra Today

नागपूर : क्षेत्रीय वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार (Vinod Sivakumar) याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली.

विनोद शिवकुमार बंगळूरला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना दिली. अमरावती पोलीस ही सकाळी नऊ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. अमरावतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, त्यांची चमू आणि लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे, पप्पू मिश्रा, प्रवीण खवसे यांनी मिळून विनोद शिवकुमारचा शोध सुरू केला. तो रेल्वे गाडी ०२२९६ दिल्ली बंगळूर एक्सप्रेस मध्ये बसण्याच्या तयारीत असताना ९.३० वाजता त्यास अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर अमरावती पोलीस त्यास अमरावतीला घेऊन गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER