उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

Ajit Pawar Corona Positive

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी केली होती. त्याच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी वृत्त दिले आहे .

पवार यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र अद्याप अजित पवारांनी याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER