अजित पवारांचा हटके अंदाज ; पहाटे तिकीट काढून पुणे मेट्रोमध्ये केला प्रवास

Ajjit Pawar

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी आज पहाटे ६ वाजता पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. या दरम्यान धावत्या मेट्रोत पवार यांनी चक्क तिकीट (Ticket) काढून प्रवासही केला. पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरीपर्यंतच पहिला प्रवास केला. मेट्रोच्या रस्त्यातील काही झाडं काढली जाणार आहेत, त्यांचं पुनर्रोपण  कसं केलं जाणार याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली. यासंदर्भात एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.

अजित पवारांनी पहाटे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात दाखल झाल्यानंतर मेट्रोसंदर्भात बैठक घेतली. यावेळी मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा संत तुकाराम नगर मेट्रो (Sant Tukaram Nagar Metro)स्थानकाकडे वळला.

यावेळी अजित पवार हे मेट्रोचालकाच्या केबिनमधून आढावा घेत होते, तर ब्रिजेश दीक्षित (Brijesh Dixit) त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. पाहणी दौऱ्यात मोजके पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते. मेट्रोसंदर्भात अजित पवार यांनी काही सूचनादेखील केल्या असून माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

ही बातमी पण वाचा : मराठा समाजाला दिलासा; आता अजित पवार ‘सारथी’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER