उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री इन अ‍ॅक्शन; कोरोनाबाधित जिल्ह्यांचा करणार दौरा

Ajit Pawar - Rajesh Tope - Maharashtra Today

मुंबई : ज्या जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) दौरा करणार आहेत. दर आठवड्याला कोरोनाबाधित जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजनाही करणार, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी श्रीवर्धनेला पत्रकार परिषद घेऊन दिली.

तिसरी लाट रोखण्याचा प्रयत्न

राज्यात तिसरी लाट येऊ नये, यासाठी कोरोनाबाधित जिल्ह्यांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ टक्के आहे. किंवा त्यापेक्षा कमी आहे. तिथे आम्ही सुविधा देणार आहोत. काही ठिकाणी ही टक्केवारी १० टक्के आहे. यामुळे त्यांच्याकडे आरोग्य सुविधांची कमतरता असल्यास त्यांना सुविधा दिल्या जाणार आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

इंजेक्शनवरील GST हटवा

म्युकरमायकोसिसच्या आजाराने उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. याचे इंजेक्शन खूप महागडे आहे. याबाबत केंद्राने एक समिती स्थापन केली आहे. या समितीकडे इंजेक्शनवरील GST कमी करण्याची विनंती केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button