अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना पहिल्यांदाच मिळाली एक्स दर्जाची सुरक्षा

Ajit pawar & Sunetra Pawar

मुंबई : राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने घेतला आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांना पहिल्यांदाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकमध्ये कोण कोणत्या नेत्यांची सुरक्षा वाढवायची आणि कपात करायची याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे याआधी सुद्धा अजित पवार हे आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडी काढण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल असताना सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. तर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना वाय सुरक्षा दिली आहे ती आधी वाय प्लस सुरक्षा होती.

या नेत्यांना पुरवण्यात आली सुरक्षा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर,दिलीप वळसे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER