उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

Ajit Pawar - Guru Purnima

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या राज्याला, देशाला गुरू-शिष्य परंपरेचा वैभवशाली वारसा लाभला आहे. राजकीय, सामाजिक जीवनात काम करत असताना आपल्यापैकी सर्वांनीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेली आहे. सार्वजनिक जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण खूप काही शिकत असतो.

तेदेखील आपले गुरूच असतात, असा संदेश देणारे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान भारतीय संस्कृतीत आज असलेल्या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडिलांनंतर गुरूला विशेष स्थान देण्यात आले आहे. गुरूकडून आपल्याला मिळणाऱ्या विद्येबद्दल गुरूची पूजा करणे, त्यांच्यासमोर नतमस्तक होणे हे महत्त्वाचे मानले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER