ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक पुष्पाताई भावे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Ajit Pawar & Pushpa Bhave

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, पुष्पाताई भावे (Pushpatai Bhave) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्राध्यापक पुष्पाताई भावे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची, सुधारणावादी विचारांची, दुर्बल-वंचित-उपेक्षित घटकांच्या हक्काच्या लढयाची, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीची मोठी हानी आहे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER