उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज पुण्यात मॅरेथॉन बैठका

Ajit Pawar Meeting

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्विकारल्यानंतर पहिल्या दिवसांपासूनच त्यांनी बैठकांचा धडाका सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बारामतीत गेल्यानंतर त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी ”डॉक्टर बॉम्ब” पॅरोलवर असताना मुंबईतून बेपत्ता

आज पुण्यात अजित पवारांच्या मॅरेथॉन बैठका होणार आहे. पीएमआरडीए, पुणे मेट्रो, नियोजन समिती आणि शिवजयंती आयोजना संदर्भात या बैठका होणार आहेत. विविध विषयांसदर्भात दिवसभरात एकूण 7 बैठकांचे आयोजन आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू राहिल.