अजित पवार वाशीपर्यंत येऊन पुन्हा पुण्याच्या दिशेन रवाना

डॉ. आंबेडकर स्मारक पायाभरणी पुढे ढकलला

Ajit Pawar

मुंबई : दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा अचानकपणेच पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज (18 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता पायाभरणी सोहळा होणार होता . मात्र पायभारणीचा कार्यक्रम पुढे ढकलल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यूटर्न घेतला . या कार्यक्रमासाठी आजचे सगळे कामकाज रद्द करून ते मुंबईच्या दिशेने येत होते. पण कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुण्याहून वाशीपर्यंत आलेले अजित पवार पुन्हा पुण्याच्या दिशेन रवाना झाले आहेत.

या कार्यक्रमाला केवळ 16 जणच निमंत्रित होते, त्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही ऐनवेळी आमंत्रण देण्यात आले होते . त्यामुळे आजचे सगळे कामकाज रद्द करून ते मुंबईच्या दिशेनं निघाले होते. पण आता ते पुन्हा पुण्यासाठी निघाले आहेत. पुण्यात सकाळी 11 नंतर अजित पवारांनी सर्व कार्यक्रम रद्द केले होते. आधीच कार्यक्रम निमंत्रण यावरून पवार नाराज होते. त्यात आता कार्यक्रम रद्द झाल्याने पवार पुण्याकडे पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER