सुभद्रा लोकलच्या ठेवीदारांना आरबीआयच्या आदेशाची प्रतीक्षा

RBI..

पुणे :रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) २४ डिसेंबरला कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केला. यानंतर पुण्यासह कोल्हापूर परिसरात असलेल्या दहा शाखा बंद झाल्या. सुमारे दहा हजार ग्राहकांच्या आठ ते दहा कोटी ठेवी बँकेत आहेत. आरबीआयचा पुढील आदेश मिळताच ठेवी देण्यास सुरुवात होणार असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. बँकिंग नियमांचे पालन होत नसल्याने आरबीआयने सुभद्रा लोकल बँकेची सेवा बंद केली.

कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक, लक्ष्मीपुरी, जोतीबा डोंबर, इचलकरंजी, कणेरीवाडी, पट्टण कोडोली, किणी, तासवडे, बेळगाव जिल्ह्यातील निपाणी आणि पुणे येथे बँकेच्या शाखा आहेत. बँकेत व्यापारी वर्गाची प्रामुख्याने खाती होती. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे अडीच कोटी तर एकूण आठ ते दहा कोटी ठेवी बँकेत आहेत. ठेवीदार चौकशी करत असले तरी आरबीआयचा पुढील आदेश येताच ठेवी परत केल्या जाणार आहेत. बँकेच्या १२० कर्मचाऱ्यांनाही पुढील भवितव्याची चिंता सतावत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER