पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त झालं, त्याला का महत्त्व देता? अजित पवारांचा पडळकरांना टोला

Ajit Pawar - gopichand padalkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचं नाव न घेता तुफान टोलेबाजी केली. “ज्यांचं डिपॉझिट वाचत नाही त्याची काय एवढी नोंद घेता तुम्ही? उभं राहिल्यानंतर जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारताय. का महत्त्व देता?” असं अजित पवार म्हणाले.

जेजुरी गडावर अहल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुतळ्याचं अनावरण उरकून घेतलं. त्याच वेळी त्यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर घणाघाती टीका केली. त्याबाबत अजित पवारांना विचारण्यात आलं.

अजित पवार म्हणाले, “अहो, त्यांची टीका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. त्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची काय एवढी नोंद घेताय तुम्ही. उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. भाजपसारख्या प्रमुख पक्षाकडून तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारता. का महत्त्व देता ?” असा उलट प्रश्न करत त्यांनी पडळकरांना टोला हाणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER