बारामतीत डिपॉझिट जप्त, तरीही मी आमदार झालो : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar - Maharastra Today

पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक लवकरच पार पडणार आहे. बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिले. माझी आमदार होण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. तशीच इच्छा समाधान आवताडेंची आहे, त्यांची इच्छाही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत पूर्ण होईल , असा विश्वास भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी व्यक्त केला. ते पंढरपुरात बोलत होते. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे.

राष्ट्रवादीने  भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवले आहे. या दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. समाधान आवताडेंच्या पहिल्या प्रचार सभेदरम्यान भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपचे फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून विरोधकांना चांगलेच घेरले आहे .पडळकर म्हणाले, ‘ही निवडणूक भारतनाना भालके किंवा त्यांच्या कुटुंबाविरोधात नाही. ही निवडणूक शेतकरी, कष्टकरी जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आहे. ज्यांनी १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठेवलं, अशा भ्रष्ट सरकारविरोधात आहे. भारतनानांना शांती मिळायची असेल, तर मविआ सरकारविरोधात मतदान करा, असे पडळकर म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button