मिरज तालुक्यातून परप्रांतीय झारखंडला रवाना

Departed from Miraj taluka to Jharkhand

सांगली : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमध्ये परप्रांतीयांचे आरोग्य तपासणी करुन प्रवासामध्ये पुरेल इतक्या अन्नपदार्थाची उपलब्धता करुन त्यांना विविध राज्यामध्ये जाण्यासाठी एस.टी. बसची व रेल्वेची अत्यंत चांगली सेवा राज्यशासनाने पार पाडली असल्याचे परप्रांतीय मजुरांना वसंतदादा कारखान्याचे चेअरमन
विशाल पाटील यांनी सांगितले.

मिरज तालुक्यातील तानंग या गावातून झारखंड या राज्यात रेल्वेने जाण्यासाठी बावीसजणानी शासनाकडे खूप प्रयत्न केले. परंतु मिरजहून झारखंड साठी कोणतीही रेल्वे गाडी धावणार नाही , असे प्रशासनाने जाहीर केले. यावर तानंग मधील परप्रांतीय मजुर खूप नाराज झाले. त्यांची जाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत मधुसुदन मालू व सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील यांनी त्यांची संपूर्ण जेवणाची व राहण्याची सोय केली. मालू व दिपक पाटील यांनी तात्काळ विशाल पाटील यांची भेट घेऊन परप्रांतीयांची समस्या कानावर घातली. त्यांनतर विशाल पाटील यांनी तहसीलदार किशोर घाडगे, नायब तहसीलदार राजमाने, झोनल अधिकारी नितीन जमदाड़े, व एसटीच्या विभागीय नियंत्रक अधिकारी अमृता ताम्हणकर यांच्या सहकार्याने

तानंग ते गोंदीया ( झारखंड हद्द) पर्यंत विशेष एस.टी बसची सोय करण्यात आली. झारखंड मधील मजूरांना यावेळी खाद्यपदार्थ, पाणीबॉटल्स तसेच विशालदादा युवा प्रतिष्ठानतर्फे सॅनिटायझर बाटलीचे वाटप करण्यात आले. विशाल पाटील यांच्या हस्ते बसची पुजा करून प्रवशांना निरोप देण्यात आला. यावेळी झारखंड मधील मजूरांना आनंदअश्रू आवरता आले नाहीत.

यावेळी कानडवाड़ी सरपंच अनिल शेगुणशे, सुनिल खोत, हेमंत (बंडू) पाटील, जगन्नाथ पाटील, मधुसुदन मालू, दिपक पाटील, गोविंद मालू, कौशिक मालू, वासूदेव मालू, धनंजय पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER