देगलूर : देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी खा. चिखलीकरांचे हनुमंताला साकडे

प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड : येणाऱ्या एक वर्षात देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देगलूर तालुक्यातील दक्षिणमुखी असलेल्या माळेगांव मक्ता येथील हनुमंताच्या चरणी शनिवारी घातले. ते माळेगांव मक्ता येथील नागरि सत्कार प्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे जेष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. धनाजीराव देशमुख, आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, भाजपाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, भाजपाचे संघटक गंगाधर जोशी, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे, सौ. प्रतिभाताई चिखलीकर, लक्ष्मण ठक्करवाड, शिवाजी कनकट्टे, अशोक पाटील मुगावकर, अशोक गंदपवार, विजय गंभीरे, राजेश महाराज देगलूरकर, चिखलीकर मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश राठोड, गंगाधर सोनार, नंदू पाटील, पळनेटकर, प्रकाश पाटील बेंबरेकर, मारोती वाडेकर, नरसिंग पाटील वळदकर, मंगल देसाई, आत्मराम पाटील सुगावकर, बालाजी पाटील लखमापुरकर, बाबु पाटील खुतमापूरकर, अनिकेत पाटील, पंकजाराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, पुंडलीक तालीमकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना खा. चिखलीकर म्हणाले की, माळेगाव मक्ता येथील दक्षिणमुखी असलेला हनुमंतराया नवसाला पावणारा आहे. अशी येथील अख्यायीका आहे. माझ्या आमदारकीच्या काळात या गावाच्या मंदिरासाठी मी काही निधी दिला होता. या गावाकडे माझे स्वतःचे गाव म्हणून मी पाहतो. या गावाने मला खुप साथ दिली आहे याचे ऋण मी शरिराच्या कातडयाचे जोडे केले तरी हे फिटणार नाही.

देगलूर तालुक्यातील जनतेच्या सत्काराने मी भारावलो आहे. माळेगांव मक्ता व देगलूर तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबध्द असल्याचे सांगत त्यांनी आपल्या खासदार निधीतून हनुमान मंदिराच्या सभा मंडपासाठी 10 लक्ष रूपयाचा निधी देण्याचे मान्य केले तर याच वेळी भाजपचे विधानसभा परिषद सदस्य राम पाटील रातेाळीकर यांनी सुध्दा माळेगांव मक्ता येथील सभा मंडपासाठी 10 लक्ष रूपयाचा निधी देऊ असे आश्वासन देत या गावाच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करा असेही यावेळी सांगितले.

यावेळी भाजपचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार माळेगाव मक्ताचे माजी उपसरपंच प्रल्हाद उमाटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विक्रम कदम यांनी केले. तर आभार शिवराज पाटील यांनी मानले. याच सत्कार सोहळयाला गावक-र्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.