डेन्व्हर युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांची मुस्लिम बोर्डिंग ला भेट.

कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी(मुस्लिम बोर्डिंग) कोल्हापूर तसेच नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला डेन्व्हर युनिव्हर्सिटी(अमेरिका) विद्यार्थ्यांनी अभ्यास भेट दिल्ली. यामध्ये डेन्व्हर युनिव्हर्सिटीतील शिक्षक स्कॉट कॅफोरा व विद्यार्थी केव्हिन, विध्यार्थिनी मॅडी, होलीस,रुबेका, विक्टोरिया, कॅटरीना यांनी सहभाग घेतला.या अभ्यासदौर्यात आलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी केले. प्रस्तावना प्रशासक कादर मलबारी यांनी केले.

उपाध्यक्ष आदिल फरास तसेच डॉ.आसिफ सौदागर यांनी आपले विचार प्रकट केले. संस्थेने बांधलेल्या मस्जीद विषयी माहिती देणेत आली. संस्था व हायस्कूल विषयी माहिती कुमारी सानोबर चौधरी या विध्यार्थिनीने दिली. आभार शालेय समितीचे चेअरमन फारूक पटवेगार यांनी मानले सूत्रसंचालन जिलानी शेख यांनी केले. या प्रसंगी दुभाषी म्हणून एम.बी.बिच्चू यांनी काम पहिले.