नोटाबंदी : मित्रांच्या कर्जमाफीसाठी पंतप्रधानांनी उचललेलं पाऊल; राहुल गांधी यांची टीका

Rahul Gandhi - PM Narendra Modi

दिल्ली : आज नोटाबंदीला चार वर्षे पूर्ण झालीत. यानिमित्त नोटाबंदीबाबत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत राहुल गांधी यांनी आरोप केला, “नोटाबंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी  विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल होतं. सामान्य जनतेच्या पैशांनी मोदींचे मित्र उद्योगपती यांची लाखो कोट्यवधी रुपयांची कर्जे  माफ केली जावी. हे चुकून झाले आहे असे समजू नका, हे जाणूनबुजून करण्यात आले होते.

काळ्या पैशाविरोधातली कारवाई अशी घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटाबंदीची घोषणा केली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकारच्या या निर्णयाचा सतत विरोध केला आहे. नोटाबंदीला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी पुन्हा या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ ट्विट केला आहे. “नोटाबंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल होतं. जेणेकरून सामान्य जनतेच्या पैशांनी मोदींचे मित्र उद्योगपती यांची लाखो कोट्यवधी रुपयांची कर्जे  माफ केली जावी. हे चुकून झालं आहे अस समजू नका, हे जाणूनबुजून करण्यात आले आहे. या राष्ट्रीय त्रासाच्या चार वर्षांसाठी तुम्हीही आवाज उठवला पाहिजे. ” असे राहुल गांधी म्हणाले.

“आज भारतासमोर मोठं  संकट आहे. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. प्रश्न हा आहे की, बांगलादेशची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे कशी गेली. एक अशी वेळ होती जेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था होती. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचे  कारण कोरोना असल्याचे  सरकारकडून सांगितले जाते. परंतु कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव बांगलादेशमध्येही आहे. इतर देशांमध्येही आहे. मग भारतच यात मागे कसा राहिला?” असा प्रश्नही राहुल गांधी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER