राहुल गांधींविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ कारवाईसाठी संमती नाकारली

K. K. Venugopal - Rahul Gandhi - Maharashtra Today

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी न्यायसंस्थेच्या संदर्भात केलेल्या एका विधानाबद्दल त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमाननेची (Contempt of Court) कारवाई करण्यास अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ (K. K. Venugopal) यांनी संमती नाकारली आहे.

केंद्रातील सत्ताधारी पक्ष (भाजपा) न्यायसंस्थेत आपली माणसं नेमत आहे, असे कथित विधान गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत केले होते. गांधी यांचे हे विधान न्यायसंस्थेची अप्रतिष्ठा करणारे असल्याचे म्हणत अ‍ॅड. विनीत जिंदाल या वकिलाने त्यांच्याविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ याचिका दाखल करण्यासाठी अ‍ॅटर्नी जनरल यांच्याकडे संमती मागितली होती. ‘कन्टेम्प्ट ऑफ    कोर्ट’ कायद्याच्या कलम १५ नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कन्टेम्प्ट’बद्दल याचिका करण्याआधी अ‍ॅटर्नी जनरल यांची संमती घेणे बंधनकारक आहे.

संमती नाकारताना वेणुगोपाळ यांनी जिंदाल यांना पत्राने असे कळविले की, फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कथित ‘कन्टेम्प्ट’च्या संदर्भात माझ्या संमतीची गरज आहे. परंतु गांधी यांनी त्या विधानात सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेखही केलेला नसल्याने माझी संमती मागण्याचा व मी ती देम्याचा प्रश्नय उद्भवत नाही. शिवाय गांधी यांचे विधान एवढे मोघम आहे की, त्याने लोकांच्या मनातील न्यायसंस्थेविषयीची आदर कमी होईल, असे मला वाटत नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER