कोल्हापूर शहरातील २०० घरात डेंग्यूचा डंख काळजी घेण्याची गरज ; यंत्रणा सक्रिय

Kolhapur - Dengue

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा महापालिका प्रशासनाने गेली महिनाभर शहरात डेंग्यू (Dengue) प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत २१ प्रभागातील ८०० घरांची तपासणी केली आहे. यावेळी २०० घरातील गोड्या पाण्याच्या साठ्यात डेंग्यूस कारणीभूत डासांच्या अळ्या सापडल्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्युच्या आळया असलेल्या पाण्यात टेमीफॉस हे द्रावन टाकून नष्ट केल्या. मात्र, कोरोनापाठोपाठ (Corona) आता डेंग्यूचा डंख सुरू असल्याने शहरवासीयांनी काळजी घेण्याची गरज आहे.

महापालिकेच्या सर्वेक्षणात घरातील फ्रीज, बॅरेल, सिंटेक्स टाक्या, कुंडया, टायर आदि २३१४ डेंग्यूच्या डासाच्या आळ्या सापडतील अशी संशयीत ठिकाणांची तपासणी केली. तब्बल ११२ डेंग्युच्या आळया आढळून आल्या. मोहीमेमध्ये डास अळी सर्वेक्षण औषध फवारणी व धूर फवारणी तसेच टायर जप्ती मोहीम व शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे व टायर्स नारळाच्या करवंट्या फुटके डबे जेणेकरून पाणी साठणार नाही आशा वस्तूंचा नायनाट करून डेंगू चिकनगुनियावर नियंत्रित ठेवण्यास मदत करावे असे आवाहन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

काय आहे डेंग्यू

 • डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे
 • एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्यामुळे होतो
 • हे डासोंची उत्पत्ती गोड्या पाण्यात होते
 • ते दिवसा चावा घेतात
 • एका संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो
 • डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) या दोन प्रकारे हा रोग होतो
 • डेंग्यू ताप हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे
 • डेंग्यू रक्तस्त्रावात्मक तापामुळे मृत्यू ओढवू शकतो

डेंग्यूची लक्षणे

 • एकदम जोराचा ताप चढणे
 • डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
 • डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते
 • स्नायू आणि सांध्यांमधे वेदना
 • चव आणि भूक नष्ट होणे
 • छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
 • मळमळणे आणि उलट्या

खबरदारी हाच उपाय

उपचारांपेक्षा खबरदारी केव्हाही चांगली असते. डेंग्यू किंवा डीएचएफच्या प्रतिबंधात्मक उपचार म्हणून कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. एडीस इजिप्ती डासावर नियंत्रण मिळवणे हाच एकमेव उपाय आहे. लवकर निदान होणे आणि रुग्णाची योग्य व्यवस्था पाहणे आणि लक्षणांनुसार उपचार करण्याने, मृत्युचा दर बराच कमी करता येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER