ऊसतोडणी कामगारांची निदर्शने

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी (sugarcane workers) व वाहतूक कामगारांची मजुरीवाढ करा, नवीन सामंजस्य करार करा, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.

कामगार कल्याणकारी महामंडळ अजून स्थापन झाले नसल्याने सामाजिक सुविधेचा लाभ मिळत नाही. या महामंडळासाठी राज्यातील साखरेच्या उत्पादनावर साखरेच्या किमतीच्या एक टक्का इतका उपकर लागू करा. नोंदीत ऊसतोड व वाहतूक कामगारांना, प्राव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी, विमा व वैद्यकीय सुविधा, हक्काच्या रजा, बोनस आदी लाभ द्या. विमा याजेना लागू करा. साखर कारखान्याकडून मोफत वैद्यकीय उपचार द्यावा. ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या मुलामुलींसाठी त्याच्या गावी निवासी आश्रमशाळा सुरू करा. सहा महिन्यांचे एकदम रेशन द्या. कारखानास्थळावर ऊसतोडणी कामगारांना पक्की घरे बांधा.

आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी डॉ. सुभाष जाधव, आबासाहेब चौगुले, आनंदा डाफळे, दिनकर आदमापुरे, पांडुरंग मगदूम, विठ्ठल कांबळे, नामदेव जगताप, रामचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER