मनसेचे पडझडीनंतर डोंबिवलीत शक्तिप्रदर्शन

डोंबिवली :- डोंबिवलीमध्ये (Dombivli) दोन दिवसात मनसेच्या दोन नेत्यांनी पक्ष सोडल्याने मोठी पडझड झाली होती. मनसे त्यातून सावरते आहे. मनसे माजी नगरसेवक आणि कल्याण-डोंबिवलीत पक्षाचा आक्रमक चेहरा असलेले मनोज घरत आणि आ. राजू पाटील यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले.

डोंबिवलीचे मनसे (MNS) शहराध्यक्ष राजेश कदम (Rajesh Kadam) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) आणि केडीएमसी गटनेते मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने मनसे मध्ये खळबळ माजली होती. अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदर राजू पाटील (Raju Patil) यांनी तातडीने ‘डॅमेज कंट्रोल’ करत मनसे माजी नगरसेवक आणि कल्याण-डोंबिवली आक्रमक चेहरा असलेले मनोज घरत यांना डोंबिवली शहराध्यक्ष पद दिले.

मनोज घरत लगेच कामाला लागले. कार्यकर्त्यांना एकत्रित करत मेळावा घेतला आणि शक्ती प्रदर्शन केले. मेळाव्यात अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला.

ही बातमी पण वाचा : मनसेत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश, शिवसेना-काँग्रेसला धक्का

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER