सेंट्रल नाका परिसरात एटीएमची तोडफोड

एटीएम सेंटर तोडफोड

औरंगाबाद :- सेंट्रल नाका परिसरातील व्हीआयपी फंक्शन हॉलजवळ असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएमची माथेफिरूंनी तोडफोड केल्याची घटना शनिवारी (दि.३०) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. माथेफिरूंनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली असल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.

ही बातमी पण वाचा : वारंवार ई-पास काढणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

सेंट्रल नाका परिसरात व्हीआयपी फंक्शन हॉलजवळ एचडीएफसी बँकेचे एटीएम  आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर  २ वाजेच्या सुमारास तीन-चार माथेफिरूंनी एटीएममध्ये प्रवेश करून तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. जिन्सी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचेपर्यंत एटीएमची तोडफोड करणारे माथेफिरू अंधाराचा फायदा घेत बायजीपुऱ्याच्या दिशेने पळून गेले. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER