‘दंडुकेशहीच्या जोरावर लोकशाही चालू शकत नाही, अन्यथा…’, मनसेचा ‘ठाकरे’ सरकारला इशारा

Raj Thackeray - CM Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना रुग्णांची आणि मृत्यू संख्येचा आलेखही वाढत आहे. त्यामुळे ‘ठाकरे’ सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयाचा व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. राज्यभरात व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही (MNS) पुन्हा एकदा कडक निर्बंधांवरून ठाकरे सरकारला (Thackeray Goverment) घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

‘अर्थचक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर जनता रस्त्यावर उतरेल, हे आम्ही आधीच सांगितलं होतं. दंडुकेशहीच्या जोरावर लोकशाही चालू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने सुधारणा करावी, अन्यथा…’, असं ट्वीट करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

दरम्यान, निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश होता. या चर्चेनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विशेष आवाहन करत सरकारने घेतलेल्या निर्णयाला सहकार्य करावं, असं म्हटलं होतं. मात्र राज्य सरकारने कठोर निर्बंध लादल्याचं दिसून येत आहे. निर्बंधाच्या नावाखाली पूर्ण लॉकडाऊन केल्याचा आरोप विरोधकांसह व्यापाऱ्यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सर्वांशी पुन्हा चर्चा करुन निर्बंधांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता मनसेनं पुन्हा एकदा सरकारवर टीका करत निर्णयामध्ये सुधारणा करण्याची मागणी उचलून धरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button