कोल्हापूर : कुस्तीचे आखाडे सुरू करण्याची मागणी

कुस्तीचे आखाडे सुरू करण्याची मागणी

कोल्हापूर : कोरोनाच्या (Corona) वाढता प्रादुर्भावमुळे कुस्तीचे मैदान, आखाडा बंद ठेवले आहेत. कुस्तीचे आखाडे सुरू करा, अशी मागणी करत कोल्हापुरातील पैलवानांनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या राजाश्रयमुळे या ठिकाणी कुस्तीचा पाया रोवला गेला. कोल्हापुरात (Kolhapur) सुमारे 500 हून अधिक तालीम आहेत. शहरात प्रत्येक गल्लीत आणि पेटात तालमीचे आखाडे आजही सुस्थितीत आहेत. उत्तर भारतातील मल्ल मोठ्या संख्येने येथे सरावासाठी येऊन राहिले आहेत.

मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून या ठिकाणच्या तालीम बंद आहेत. पैलवानांचा सराव बंद आहे. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून इतर व्यवसाय, त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट या सर्व व्यवसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कुस्ती तालीम सुरू करण्यासही परवानगी मिळण्याची मागणी पैलवान ग्रुपच्या वतीने करण्यात आलीय.या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER