मुंबईची लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा ; राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

Rohit Pawar

मुंबई : राज्यात अनलॉकच्या (state Unlock) टप्प्यात सर्व गोष्टी हळूहळू सुरू केल्या जात असताना मुंबईची लोकल मात्र अद्याप सर्वांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुंबई लोकल आता सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी आज मुंबईत परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांची भेट घेतली.यासंर्भात पवार यांनी अनिल परब यांच्या भेटीचं एक ट्विट देखील केलं आहे.

लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत एपीएमसीमध्ये गेलो असता माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठी लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER