तुमचा मनसैनिक खचलाय; मनसे पदाधिकाऱ्याचे राज ठाकरेंना आवाहन

Maharashtra Today

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार(Avinash Pawar) यांना बनावट ऑडिओ क्लिप (Audio Clip) तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी 1 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. यावरून अविनाश पवार(Avinash Pawar) यांनी एक व्हिडीओ शेअर करत याप्रकरणी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवावा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही, असं अविनाश पवार म्हणाले आहेत.

दरम्यान मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केली असल्याचा दावा निलेश लंके यांनी केला आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे . . त्यामुळे आता राज ठाकरे या प्रकरणात काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button