‘बायोबबल’ नियमांनुसार पायी आषाढीवारीला परवानगी द्या; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

Devendra Fadnavis

पंढरपूर :- यंदाच्या पायी आषाढी वारीला (Ashadhi Wari) ‘बायोबबल’ नियमांनुसार (Biobubble rules), परवानगी द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून केली आहे. पायी वारी काढण्यावर वारकरी संप्रदाय ठाम आहे. त्याचवेळी आळंदी आणि पालखी मार्गातील काही गावातील ग्रामस्थांनी पायी वारी नको, अशी मागणी केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वारकरी संप्रदायाने भेट घेतली होती. त्यानंतर पायी वारीसाठी बायोबबल नियमांनुसार परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे.

ही बातमी पण वाचा : मानाच्या दहा पालख्यांना आषाढीवारीची परवानगी; अजित पवार

कोरोनाचे (Corona) वाढता प्रादुर्भाव, दररोज सापडणारे कोरोनाचे नवनवीन स्ट्रेन, तिसऱ्या लाटेचा दिलेला इशारा अशा परिस्थितीत आषाढीपायी वारीला नागरिक आणि प्रशासनाने तीव्र विरोध केला आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, गेल्यावर्षी पेक्षा यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठी मनुष्यहानी झाली आहे. अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. अशावेळी यंदाही गेल्यावर्षी प्रमाणे आषाढीयात्रेला येणारे पालखी सोहळे बसमधून आणण्याची मागणी पंढरपूर, आळंदी येथील नागरिकांसह पालखी मार्गावरील गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button