महिलांच्या आयपीएलचीही मागणी जोर धरतेय…

आयपीएलला (IPL) हळूहळू रंग चढत असताना आता महिला क्रिकेटचीही (Women Cricket) अशीच पूर्ण ताकदीची आयपीएल आयोजित केली जावी अशी मागणी महिला क्रिकेटपटूंकडून होत आहे. त्यात इंग्लंडची कर्णधार हिथर नाईटसुध्दा (Heather Knight) सुध्दा आहे. हिथरच्या आधी स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिनेसुध्दा अशी मागणी केली होती आणि बेन स्टोक्स व के.एल.राहुलसारख्या पुरुष क्रिकेटपटूंनीही महिला आयपीएलला पाठिंबा दिला आहे. इशा गुहासोबतच्या एका बातचीतीच्या कार्यक्रमात मानधना, स्टोक्स व राहुल यांनी ही मते व्यक्त केली होती.त्यानंतर आता हिथर नाईटने आयपीएलसारख्या स्पर्धेने महिला क्रिकेटमध्ये फार मोठा चांगला बदल होईल असे म्हटले आहे.

हिथरने म्हटलेय की स्टोक्सी महिला आयपीएलचे समर्थन करतोय हे बघून बरे वाटले. महिला क्रिकेटला असे समर्थन मिळत गेले तर दृष्टिकोन नक्कीच बदलेल.

महिलांच्या आयपीएलची चर्चा बऱ्याच दिवसांपासून आहे आणि बीसीसीआय कदाचित ती नजिकच्या काळात सुरूसुध्दा करेल. ‘दि हंड्रेड’ या नव्या प्रकाराबद्दलही हिथर उत्सुक आहे. हंड्रेडमध्ये महिलांनी सामना खेळणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे यंदाचा सिझन विशेष ठरणार आहे असे हिथरने म्हटले आहे.

30 वर्षीय हिथर ही इंग्लंडची विश्वविजेती खेळाडू असून 2010 पासून ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतेय.बिग बॕश लीगमध्ये ती सिडनी थंडर्स कडून खेळली आहे आणि आता आयपीएलचाही हिस्सा बनण्यास ती उत्सूक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button