ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम व मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची मागणी

Manoj Kotak-OTT Platform

नवी दिल्ली :  कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊनमध्ये गेला आणि दुध – भाजीपाला – फळं आणि औषधं, दवाखाना यापलिकडच्या सर्व सोयींवर सरकारने कठोर निर्बंध घातलेत. त्यात मनोरंजन वगैरे फारच लांब राहिले होते. भौतिक प्रझेन्स जाऊन व्हर्च्युअल गोष्टींकडे लोक वळलेत. याचाच फायदा सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सनी (OTT platforms) घेतला. आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची मागणी प्रचंड वाढली.

ओटीटीवर अनेक वेबसिरीज, मोठमोठ्या बजेटचे सिनेमेही प्रदर्शित होऊ लागलेत. मात्र, चित्रपट गृहात प्रदर्शित होणा-या सिनेमाला जसा सेन्सॉर बोर्ड असतो तसा ओटीटीवर प्रदर्शित होणा-या कंटेटलाही कात्री घालता आली पाहीजे अशी मागणी अनेक स्तरातून होऊ लागली. त्याला कारणही तसेच म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोकळेपणाने केले जाणारे प्रदर्शन ज्यामुळे अनेकदा वाद निर्माण झालेला पाहायला मिळाला. मग तो प्रिया बापट सारख्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा लेस्बियन किंसिंग सिन पासून ओटीटी प्लॅटफॉर्म अधिक चर्चेत आले.

या ओटीटीवर काही निर्बंध असावे अशी मागणी भाजपकडून जोर धरू लागली आहे.

त्यातच ओटीटी प्लॅटफॉर्मसना वेब सिरीज च्या माध्यमातून हिंदू भावना दुखवायची सवय झाली आहे असे भाजपचे खासदार अशोक कोटक यांनी म्हटले आहे एवडेच नाही तर, म्हणून मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम व मार्गदर्शक सूचना आणण्याची विनंती सरकारला केली आहे. असे खासदार कोटक  यांनी सांगितले आहे.

लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करून ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्सित होणा-या कंटेटवर निर्बंध असावेत काही नियम अटी सरकारने घालाव्यात अशी विनंती खासदार कोटक यांनी लोकसभेत केंद्र सरकारकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER