राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक घोषित करण्याची मागणी

Supreme court

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने हिंदूंना नऊ राज्यांत अल्पसंख्याक दर्जा द्या, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्राला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. इतकेच नव्हे, तर याबाबत जितक्या याचिका उच्च न्यायालयात किंवा अन्य न्यायालयात असतील, त्या सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याचेही आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगातील कलम हटवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे, ज्यानुसार देशात अल्पसंख्याकाचा दर्जा दिला जातो. ज्या नऊ राज्यांत हिंदू अल्पसंख्याक आहेत, त्यांना कायद्यानुसार अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने अल्पसंख्याक कायद्याच्या कलम २(सी) अंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन समाजांना अल्पसंख्याक घोषित केले आहे. मात्र ज्यू समाजाला त्यांनी अल्पसंख्याक जाहीर केले नाही. देशातील नऊ राज्यांमध्ये हिंदू धर्मीय अल्पसंख्याक आहेत, त्यांनादेखील अल्पसंख्याकांचे लाभ मिळत नाही, असा दावा उपाध्याय यांनी याचिकेत केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER