दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत २५ टक्क्यांनी वाढ

Dairy Products

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे राज्यात रोज दहा लाख तर जिल्ह्यात सरासरी दोन लाख लिटर दूध शिल्लक राहात होते. शिल्लक दुधापासून निर्माण केलेल्या दूध पावडरचा प्रश्‍न मात्र आजही कायम असून पावडर करण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

दरम्यान गेल्या महिनाभरापासून अडचणीतील दूध व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहे. येत्या दसरा- दिवाळीत हॉटेल व्यवसाय, पर्यटन सुरू झाल्याने बाजापेठ अजून वेग पकडेल, दुग्धजन्य पदार्थांची मागणी किमान २५ टक्के वाढेल, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने दूध संघांनी तयारी सुरू केली आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यंत अडचणीत सापडलेला दूध व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. बाजारपेठा खुल्या झाल्यानंतर उपपदार्थांची मागणी संथगतीने का असेना वाढत आहे.

दूध आणि दुधापासून बनणाऱ्या दही, ताक, तूप, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, बटर या उपपदार्थांची मागणी लॉकडाउनमध्ये एकाएकी थांबली. घरगुती दूध वापर होता; मात्र हॉटेल बंद झाले, सार्वजनिक कार्यक्रम थांबले, चहाचे गाडे बंद झाले. त्यामुळे सुमारे ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दुधाची खपत थांबली होती. ती आता पूर्वपदावर येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER