रुग्णांना सक्तीने डिस्चार्ज करुन रस्त्यावर टाकणार्‍यांवर कारवाईची मागणी

सांगली :- मिरज सिव्हील हॉस्पीटलमधील तीन रूग्णांना रूग्णालयातून सक्तीने डिस्चार्ज देवून रस्त्याच्या कडेला फेकून देवून त्यापैकी एका रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टर व कर्मचार्‍यांना त्वरीत निलंबीत करावे, अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्यकडे करण्यात आली आहे.

शिवसेनेचे सांगलीचे उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांच्या शिष्टमंडळाने डॉ. नीलम गोर्‍हे यांची भेट घेऊन त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर डॉ. गोर्‍हे यांनी घटना का घडली, कश्यामुळे घडली, या परिस्थिती मध्ये रूग्णांना का रूग्णालयांच्या बाहेर कां काढले या बद्दल संबंधित िअधकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटने बद्दल ज्या कुणाकडे विशेष माहिती असेल त्यांनीही माझ्याकडे माहिती द्यावी. जे जबाबदार असतील , त्यांच्यावर योग्य ती कारवाई होण्याच्या दृष्टीकोणातून रूग्णांची अशा प्रकारे हेळसांड होऊ नये. म्हणून मी उपसभापती या नात्याने विशेष लक्ष घालत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, नितीन काळे, उपस्थित होते. ऊपसभापती कार्यालयाचे प्रमुख सचिव रवींद्र खेबुडकर ,सचिव प्रविण सोनावने ऊपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : मिरजेत दोन किलो गांजा जप्त : धुम‘पान करणार्‍या वीस जणांना दंड