… साहेबांना घरी बसून पडतात दिल्लीची स्वप्न : भातखळकरांचा शिवसेनेला टोमणा

मुंबई : राज्यसभा उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला, आता म्हणे विधान परिषदेवरही दुसऱ्या पक्षातील पडेल उमेदवाराची आयात होणार…सत्तेचे अस्तित्वही दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर! आणि साहेबांना घरी बसल्या बसल्या दिल्लीची स्वप्न पडतात!! असे ट्विट करून आमदार भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोमणा मारला.

विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस महाविकासआघाडीकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली जाणार आहे. यातील बहुतांश उमेदवार बाहेरून आयात केलेले असणार की स्वपक्षातीलच? याबाबत अद्याप चित्रं स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याची चर्चा आहे.

या आधी, काँग्रेसमधून शिवसेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांची उपनेतेपदी नियुक्त करून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. त्यावेळी राज्यसभेसाठी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरै, दिवाकर रावते यांची नाव चर्चेत होती. एप्रिल २०१९ मध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर करावं असे माझे मत आहे, असे म्हणत संजय राऊत म्हणाले होते – उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरअसे कधीच नसते. उद्धव ठाकरेंनी केंद्राविरोधात लढण्याची तयारी करताना बिगरभाजपा राज्यांना आवाहन केले आहे. या सगळ्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर कराव. उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता होताना मला दिसत आहे. यावरूनही भातखळकर यांनी ट्विटमध्ये टोमणा मारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER