दिल्ली हिंसाचाराचे ‘युनो’त पडसाद

António Guterres

न्यू यॉर्क :- दिल्ली हिंसाचाराचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ अर्थात ‘युनो’ने या हिंसाचाराची दखल घेतली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरस यांनी हिंसाचारात बळी गेलेल्या व्यक्तींबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

‘स्वातंत्र्य चळवळीत तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?’ शिवसेनेची संघ परिवारावर थेट टीका

सध्याच्या परिस्थितीत अत्याधिक संयम बाळगावा आणि हिंसा टाळावी, असे आवाहन ‘युनो’चे सरचिटणीस ग्युटेरस यांनी केले आहे. अँटोनिओ ग्युटेरस यांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ‘युनो’ने या घटनेची दखल घेतली असल्याचे ते यावेळी म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायदा ‘सीएए’वरून दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३४ जणांचा बळी गेला असून, २०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत, हे येथे उल्लेखनीय.