दिल्लीकरांना मिळणार मोफत लस; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Today

नवी दिल्ली :- देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता दिल्ली सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस (Free Corona Vaccine) देण्याची घोषणा केली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ५२ हजार ९९१ नवे रुग्ण आढळून आले, तर २ हजार ८१२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. १ मेपासून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जाईल, असे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी केजरीवाल यांनी लसींच्या दरावरून टीकेची झोड उठवली. केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किमतीत लस मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे. नफा कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य पडले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहिजेत, अशी सूचना केजरीवाल यांनी केली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने लसींचे दर निश्चित केले आहेत.

यात कोविशिल्ड राज्य सरकारला ४०० रुपये, खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांत मिळणार आहे. तर कोवॅक्सीन राज्य सरकारला ६०० रुपये, खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांत  मिळणार आहे. दुसरीकडे ही लस केंद्राला १५० रुपयांत  देणार आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्रावर टीकास्त्र सोडले आहे. भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ कोरोना रुग्ण आढळले. यासोबत एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे. तर २८१२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत २ लाख १९ हजार २७२ जण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button