गौतम गंभीरपुढे ‘निःशुल्कच्या‘ ट्विटमुळे अडचण, द्यावे लागेल पोलिसांना उत्तर

Gautam Gambhir

नवी दिल्ली :- कोरोना (Corona Virus) साथीच्या काळात मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. सामाजिक संघटना, मोजके राजकारणीही यात मागे नाहीत. खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) (भाजपा) (BJP) ने ट्विट करुन ‘फॅबीफ्लू’ औषधाचे निःशुल्क वितरण करण्याची घोषणा केली आणि यामुळे तो पोलिसांच्या चौकशीच्या कचाट्यात अडकला.

गंभीरने २५ एप्रिल रोजी ऱ्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले – आपण सध्या सगळे जण एकमेकांच्या पाठीशी उभे आहोत. मी दिल्लीच्या लोकांना फॅबीफ्लू औषध देत आहे, जे तुम्ही जीजीएफच्या कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान नेऊ शकता. यासाठी आधार आणि डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन दाखवावी लागेल. याशिवाय आम्ही ऑक्सिजन सिलिंडरही देत आहोत. दिल्ली पोलिसांना जाणून घ्यायचे की फॅबीफ्ल्यू औषध गंभीरकडे आली कुठून?

गंभीरच्या निःशुल्क औषध वाटपावरुन काही राजकीय नेत्यांनी त्याच्यावर आरोप केले. काँग्रेसचे पवन खेरा आणि आपच्या दुर्गेश पाठक यांनी ही औषध गौतमकडे कुठून आली, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. त्यानंतर आता दिल्ली पोलीस गंभीरची चौकशी करणार आहे.

गौतम गंभीर फाऊंडेशनची मदत

कोरोनाकाळात गौतम गंभीर आणि त्याचे फाऊंडेशन दिल्लीतील लोकांसाठी मैदानात उतरले आहे. गौतम गंभीर फाऊंडेशन गरजूंना मदत करत आहे. काही दिवसांत त्याला दिल्ली पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button