दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, पाच जणांना अटक

DCP Pramod Kushwaha - Five Persons Apprehended

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये घातापाताचा मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीमधील शिकारपूर परिसरात झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर सामग्री जप्त केली आहे.

विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाहा (DCP Pramod Kushwaha) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील शिकारपूर परिसरात झालेल्या गोळीबारानंतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील दोघेजण पंजाब तर तिघे जण काश्मीरचे आहेत. शस्त्र तसंच इतर कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे.

या सर्व दहशतवाद्यांना आयएसआयचा पाठिंबा होता अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान ते कोणत्या दहशतवादी संघटनेसी संबंधित आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नसल्याचंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER